Updated: Jun 26, 2022
अख्या कुळाचं सामर्थ्य घेऊन चालणारा आज 'पंचष्टी' गाठलेला आबा पाय घसरून फरशीवर पडला,आणि मला फोन आला, तोंडावर आलेल्या परीक्षां आणि जाण अशक्य , म्हणून थोड्या दिवस वाट बघितली, फोन वर कळलं की जास्त काहि नाही पण आबाना आतुन कमरेचा आणि एका पायाचा त्रास खूप होतोय. जास्त काही नाही तू ये आरामात अशी आई बोली, तिने माझ्या परिक्षेमुळे मला नाही सांगितले किंवा तेवढंच होत, किंवा जास्त पण इकडे छातीचे ठोके वाढलेले!
त्याच्या सोईमध्ये काही कमी नव्हतीचं आणि त्यानेही स्वतःच्याचं नाहीतर दुसऱ्याच्या सुद्धा सोईमध्ये काही कमी पडू दिली नाही, आबा तेव्हाचे वैद्य खुप काही लोकांच्या तोंडी त्याच नाव अजूनही देवा सारखं घेतल्या जात, रात्री तीन वाजता जाऊन विचू चावला ह्यावर ते इलाज करायला गेलेलं अस मला तरी आठवत, मग त्याच्या साठी घरचे किंवा बाहेरचे काय करतील हे विचारात घ्यावयाची बाब नव्हतीचं. आता हा वृध्द म्हातारा आमचा आबा इकडे जीवाचे हाल करत त्या पांढऱ्या रंगाच्या चादर असलेल्या बेडवर निपचित निजालाय, त्याची तीन वंशाचे दिवे व सगळयात मोठी पोरगी आज त्यांच्या साठी किती तरी येरझाऱ्या मारताय, आयुष्यभर ह्या मानसाने सगळ्या बारीकसारीक गोष्टी उपकार नाही तर कर्तव्य म्हणून पार पाडल्या न काही गोष्टीचा लोभ करता! इडकून तिकडे सगळया गोष्टीची विल्हेवाट ह्याने लावली, त्याकाळी मुलीचं शिक्षण इयत्ता सातवी तरी ते आईला शिकू दिलं आणि एका मामाला आयटीआय करायला दुसऱ्या गावी पाठवल , स्वतःच्या गरजा स्वप्न , जे काय असेल ते मुलावर कधीच थोपलं नाही आज तोच आबा पाय इचकून बसलाय , नवल वाटलं !!! त्याने मुलाबाळांच्या नाहीच तर नातवाना सुद्धा किती तरी गोष्टीचा सवाद लावला, कोणी काय विचारलं की "काय होतं" असा त्याचा शब्द होता! आता त्याच्या साठी सगळ्या लोकांनी अख्या दवाखाना डोक्यावर उचलल्या सारख वाटत होतं, आणि ह्यात आबा अरे!!! कश्याला करताय झाला की आता! हयांच रडगाणं चालू! संगळ्याच्या भेटी वैगरे करून झाल्या ,आबाना सगळ्यांना भेटायचे होते आठवण झाली ती माझी !!! आबाला दवाखान्यात आज दोन दिवस झालेले, काहीसा तळमळत आपलं आवरत निघालो आणि थोड्या वेळात तिकडे पोहचलो आजोबा तिकडेच त्याच अवस्थेत होते, पण आता जास्त वय असल्यामुळे आबाची स्मरणशक्ती कमी होऊ लागली ! उलटसुलट काही तरी बोलत होते की आज मी शेतात जाऊन येणार आणि आबानी गेली सात वर्षे घराच्या बाहेर पाउल काढला नव्हता!! माझा सिद्धेश शाळेतून आलाय की नाही असं काही तरी ते विचारायत असायचे आईला आणि आई फक्त बोलायची की "अहो येताय हो आबा!! बाबू गेलाय त्याला आणायला तुम्ही शांत राहा आणि निपचित निजा!" आईला पण कधी कधी रडायला यायचं! तिने तरी बिचारीने किती बघायचे, आता पर्यंत सुग्रीणीच्या घरट्या प्रमाणे फक्त आज तिथं घरटं तिच्या शिवाय ओसाड वाटत होतं, डोळ्यापर्यन्त आलेलं अश्रू त्याच पदराने किती तरी दिवस ती पुसत होती ती तरी काय करणार, नाईलाज हो! मी सामोरे आल्यावर मला त्यांनी पण अरे सिद्धेश आलाय का अस विचारलं,मला काय बोलायचं तेच कळना, दोन तीन क्षण मलाच बोलावल जमेना, दिवाळी मध्ये आबा तंदुरुस्त होते माझ्याच काही कारणामुळे मलाच भेटता आलं नाही, म्हंटल येणं जाण होतचं आज नाही उद्या भेटू, पण तेंव्हा पासूनचं आता भेटलो ते अस जेंव्हा ते मला ओळखत पण नाहींयत, मी का आधी भेटलो नाही का आता , हे झालंच का असे कितीतरी विचार डोक्यात येऊन गेले! तेंव्हा आबा बोले अरे तू कोण, मला नाईलाज होता अहो आबा मी , मीच सिद्धेश ,अहो शाळेतुन आलोय ! आता तुम्ही बरे व्हा लवकरचं आपल्याला शेतात जायचंय!
आणि मी तसच बाहेर पडलो, डॉक्टर बोले की आता काळजी घ्या वेळ लागेल होईल नीट!!! ज्या गोष्टी नेहमी जवळ भासतात त्याच्या पासूनचं आपण किती तरी वेळा दूर सावरल्या जातो! कोणाच्याही शिवाय आयुष्य आखता येतं पण आनंदाने नाही!तडजोडीचे व्यवहार असतात नाते नाही! खूप काही गोष्टीसाठी वेळ आखून दिलेली असतेचं पण त्या करावयाच्या की नाही हे आपण ठरवतो ! खूप सोपं आहे जे आवडतं ते करायला आणि जे नाही आवडतं त्याकडे दुर्लक्ष करायला पण कोणाकडे करायचं ते आपण ठरवतो !

-भाग्येश