तुफान
तुफानाच्या वाटेला,
तू प्रार्थनेची हाक दे....
विध्वंसाच्या ह्या राक्षसाला,
तू धैर्याची थाप दे...
नखऱ्याच्या ह्या नागाला
तू माणुसकीचा राग दे...
कोवळ्या ह्या द्वेषाला,
तूझ्या हातांचा तू स्पर्श दे...
उन्हातल्या पाषाणाला,
आईशी तू छाया दे...
भटकत्या ह्या तुफानाला,
फक्त तुझें एक घर दे.
-भाग्येश